समस्या नाही असा
मनुष्य नाही !
उपाय नाही अशी
समस्या नाही !
ज्योतिषशास्त्रमध्ये
भविष्य वर्तविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यात अग्रकमावर जन्मकुंडलीचा मार्ग आहे.
त्यानंतर हस्तसामुद्रिक, अंकशास्त्र, फेस रीडिंग, नाडी ज्योतिष, रमल, टॅरोटकार्ड, मॅजिकबॉंल, स्वाक्षरी वरून, पाय बघून, भविष्य सांगणे यासारखे अनेक प्रकार आहेत.
गायत्री उपासक आण्णाच्या मते जन्मकुंडली हेच
ज्योतिष्य जाणून घेण्याचे सर्वात उत्तम साधन आहे. कारण ते सर्वात प्राचीन
आहे. हजारो वर्षापूर्वी भृगू ऋषींनी स्रियांसाठी आणि पुरूषांसाठी असे दोन
स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. ते भृगूसंहिता
म्हणून प्रसिध्द आहेत. या ग्रंथा मध्ये जेवढ्या
जन्मकुंडल्या भविष्यासह मांडलेल्या आहेत, त्या व्यक्तिरिक्त जगात कुणाचीच कुंडली असू शकत नाही !
म्हणजे आज पर्यंत जेवढे लोक जन्माला आले किवा येथून पुढे जन्माला येणार आहेत त्या
सर्वांच्या कुंडल्या भृगू ऋषींनी हजारो वर्षापूर्वी तयार केल्या आहेत. इतके हे
अचूक गणितावर आधारलेले शास्त्र आहे. म्हणून विश्वसनीय आणि जगमान्य आहे. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण यानुसार तयार केलेली कुंडली अचूक
असते. त्यावर कुणाचेच दुमत नसते. कुंडलीमधील बारास्थाने व आकाशातील बारा ग्रह व
त्यांची फलिते सर्वमान्य आहेत. इतर प्रकारामध्ये असे होत नाही. स्थलभिन्नत्व आणि
व्यक्ती भिन्नत्वाप्रमाणे फलितांमध्ये फरक पडतो असा सार्वत्रिक अनुभव आहे.
दुसरे असे की इतर प्रकारात भूत व भविष्य यावरच प्रकाश
टाकता येतो. मग वर्तमानाचे काय? माणसाच्या
जीवनातल्या आजच्या समस्या निवारणाचे उपाय शोधण्यासाठी जन्मकुंडलीच उपयोगी पडते.
गायत्री उपासक आण्णा तुम्हाला तुमच्या भूतकाळातील घटना सांगून आश्चर्यचकित करीत
नाहीत किवा भविष्यकालीन स्वप्न दाखवून तुमचे रंजनही करीत नाहीत ते विचारतात तुमची
आजची समस्या काय आहे? त्याचे उत्तर जन्मकुंडलीत शोधून तुम्हाला मोफत सल्ला
देतात. त्यासाठी शांतीपूजा व होमहवन आणि मंत्रजप असे सात्विक, शाश्वत आणि बिनधोक, धार्मिक मार्गाचा
अवलंब करतात. त्यामुळे तुम्ही जरी समस्यांच्या चिखलात आकंठ बुडालेला असलात तरी
आण्णाच्या संपर्कात आल्यानंतर कमळाप्रमाने हसू लागता!! एक मात्र निश्चित आहे की
त्यासाठी तुमची आण्णावर श्रध्दा असायला हवी. म्हणजे तुम्हाला फळ मिळणार
ही काळ्या दगडावरची रेघ आहे पण तुमच्या श्रद्धेनुसार अवधीमध्ये
कमी जास्त फरक पडणार! विशेष म्हणजे हे करीत असताना गायत्री उपासक आण्णांना, गंडे-दोरे, अंगारे-धुपारे, लिंबू-मिरची, खडे-रत्ने वगैरे
वगैरे सारख्या कुबड्यांची गरज भासत नाही!!
जारण-मारण-उच्चाटन-संमोहन-मूठ मारणे अशा अघोरी
मार्गाचा अवलंब करणाऱ्याविषयी आण्णांना तिटकारा आहे!! असल्या समाजद्रोही मूठभर
माणसामुळे मूळचे पवित्र शास्त्र हकनाक बदनाम होत आहे असे अण्णाचे स्पष्ट मत आहे. सतत एक तप असंख्य कुंडल्याचा अभ्यास करून
आणि त्यांच्या फलितांचा पडताळा पाहून गायत्री उपासक आण्णांनी ठळक असे दोष शोधून
काढले आहेत.
१) काळसर्प योग : काळसर्प योग हा काल्पनिक आहे. या योगाचे जे अनेक
प्रकार आहेत त्यांचा निकष लावायचा म्हटला तर शेकडो ९०% लोकांचे पत्रिकेत हा योग
आढळून येईल. आमच्याकडे येणारा जातक बऱ्याच ठिकाणी फिरून आलेला अस्तो. त्यामुळे तोच
आम्हाला योगाची शांती करण्याचा "मोफत" सल्ला देतो म्हणून आम्ही ही शांती
करून देतो.
२) मंगळ दोष, मंगळ-राहू विषयोग,मंगळ-रवि अंगार
योग, मंगळ-शनि संघर्ष योग : जन्मकुंडलीमध्ये व्दादश, प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि अष्टम या स्थानांमध्ये मंगळ असेल तर तो मंगळदोष
मानला जातो. हा मंगळ मुखत्वे करून विवाहकार्याला आडकाठी आणतो. मंगळाचा जप व हवन
करून मंगळाची दाने दिली म्हणजे हा शांत होतो.
कुंडलीमधील कुठल्याही स्थानामध्ये मंगळाबरोबर रवि
असला तर अंगार योग होतो. कारण रवि व मंगळ हे दोन्ही अग्नी तत्वाचे व उष्ण
प्रकृतीचे ग्रह आहेत. त्यामुळे जातकाच्या तापटपणाचा स्फोट होणारे प्रसंग वारंवार
येतात.
मंगळासह राहू असला तर विष योग होतो. असा जातक वैषयिक
होतो. विषयोपभोगामागे लागून स्वतःचे आर्थिक, शारीरिक व मानसिक
नुकसान करून घेतो. या मंगळाच्या साथीला शनी महाराज असले तर संघर्ष योग होतो. अशा
माणसांना पदोपदी संघर्ष करावा लगतो. त्याशिवाय साधी गोष्टही त्यांना सहजपणे
साध्य करता येत नाही. अपमान आणि अपयश यांनी माणूस खचून जातो.
३) गुरु - राहू
चांडाळ योग : उच्चवर्णीय गुरूच्या संपर्कात
मातंग जातीचा राहू आल्यावर चांडाळ योग होतो. याचे प्रमुख फलित म्हणजे आर्थिक संकटे
योग्यतेपेक्षा कमी लाभ मिळालेला पैसा टिकत नाही. दृष्ट लोकांचे संगतीमुळे
आर्थिक नुकसान व मानहानी, कर्जबाजारी होणे असे परिणाम दिसतात.
४) ग्रहण योग : राहू किवा केतूची
चंद्र किवा रवि बरोबर युती झाली म्हणजे ग्रहण योग होतो. यामुळे माणसाच्या सुखाला
ग्रहण लागते. रविमुळे अधिकार मिळतो. पण बॉसच्या बायकोच्या भावाची किवा त्याच्या
सेक्रटरीचे वर्चस्व सहन करावे लागते किवा हितशत्रूच्या कारवायांमुळे हैराण
व्हावे लागते. हेच दोघे चंद्रासह असता मानसिक चंचलता, अस्वस्थता किवा मनाचा कोंडमारा होणे व एकांतवास असे अनुभव
येतात.
५) शनी-रवि किवा शनि-राहू शापित योग : हा योग पूर्वजांचा शाप दर्शवितो. या योगामुळे जातकाला
कोणत्याच कामात यश मिळत नाही. प्रगती खुंटते. नोकरी लवकर मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही. धंदा असेल तर नुकसान होऊन धंदा बुडतो.
संसारत अडचणी, वैवाहिक जीवनात असंतोष, संततीत किवा
संततीपासून त्रास, अपेक्षित असलेला लाभ अनंत घोटाळे निर्माण होऊन तो
मिळण्यास विलंब लागणे. हातातोंडाशी आलेला घास जाणे, मुला-मुलींचे
ठरलेले विवाह मोडणे किवा अशा तऱ्हेच्या अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. एकूणच
जीवनातील सर्वच आघाडयांवर अपयश येते, आणि त्यातून
आलेल्या नैराश्यामुळे माणूस हतबल होतो.
६) चंद्र - शनि विकलांग
योग - जन्मकुंडलीमध्ये चंद्रासह शनि असला म्हणजे हा योग
होतो. यामुळे जातकास शारीरिक अथवा मानसिक विकलांगत्व येऊ शकते. म्हणजे शरीराचे
एखादे अवयवास पंगुत्व येणे, मनोबल नसणे. त्यामुळे समाजात वावरताना न्यूनगंड
उत्पन्न होणे. असे अनुभव येऊन माणसाचे मानसिक / शारीरिक खच्चीकरण होते.
७) सर्वारिष्ट शांती : शनि हर्षल व नेपच्यून ही ग्रहत्रयी कुंडलीत कोठेही
झाली तर माणसाला अपघाताचे भय जास्त असते. ही शांती केल्याने अशा गोष्टींना
आळा बसतो व त्याचा फायदा त्या जातकासह त्याच्या कुटुंबातल्या इतर
सदस्यांनाही होतो.
८) पुत्रकामेष्टी / गोपाल संतान व्रत-जप : संततीप्राप्तीसाठी हा विधी केला जातो. पती-पत्नी
दोघेही जेव्हा शारीरिकदृष्ट्या निर्दोष असतात पण लग्नाला अनेक वर्षे होऊनही संतती झाल्याची उदाहरणे आमच्याकडे शेकड्यांनी आहेत.
दशरथ राजाला पुत्रकामेष्टी केली यज्ञ केल्यानंतरच राम-लक्ष्मनासारखे दिव्य पुत्र
प्राप्त झाल्याची गोष्ट सर्वश्रुत आहेच!
९) कुंभ / कृष्माड विवाह : जेव्हा
पत्रिकेमध्ये वैधव्य योग होतो त्यावर हा उपाय केलास जातो. एखाद्या गुन्ह्याला
एकदाच शिक्षा होते या तत्वावर ही संकल्पना बेतली आहे. या विधीमध्ये जातकाचा विवाह
कुंभाशी (खापराचे मडके) लावला जातो. मग लग्नानंतर हा कुंभ फोडून त्याच्या अस्थि
पाण्यात विसर्जित केल्या जातात. अशा रितीने लुटुपुटुच्या लढाईप्रमाणे जातकाला
काल्पनिक वैधव्य दिले जाते आणि पुढील आयुष्यातील संकट टळते.
१०) गुरुबळ : जेव्हा एखाद्याचा
विवाह प्रमाणाबाहेर लांबतो किवा एखाद्याची नोकरी व्यवसायामध्ये सातत्याने पिछेहाट
होते, अथवा सर्व प्रकारच्या कोर्टकेसेसमध्ये न्यायाची बाजू
असूनही हार होते. तेव्हा ही शांती केली जाते.
११) सतीचा शाप-पितृदोष : या दोषांमुळे मिळणारी फळे बहुतांशी शापित योगाप्रमाणे
असतात.
१२) गोमुख प्रसव शांती : देहशुद्धीसाठी गाईच्या तोंडून स्वतःचा पुनर्जन्म करून घेणे
याला गोमुख प्रसव शांती असे म्हणतात नंतर ही गाय ब्राह्मणाला दान दिली जाते.
१३) उदक शांती : उदक शांती चार कारणांसाठी केली जाते. त्याने चारही कारणाचे
उद्देश ग्रहशुद्धीकरण हेच असते. पहिले कारण म्हणजे कालसर्प शांती केल्यानंतर उदक
शांती करावी लागते. कारण त्याशिवाय कालसर्प शांतीचे फळ मिळत नाही. दुसरे
म्हणजे घरातील व्यक्ती निधन पावल्यानंतर तेरावा चौदावा विधी केल्यानंतर
ग्रहशुद्धीसाठी उदकशांती करतात. तिसरे म्हणजे चारधामपैकी एखादी यात्रा करून
आल्यानंतर घरी गंगापूजन असते असे तेव्हा उदकशांती करतात. चौथे म्हणजे वास्तुशांती
तात्पुरता पर्याय म्हणून उदकशांती करतात.
आमच्याकडे वरील सर्व शांती कर्माबरोबरच पारंपारिक
ज्योतिषशास्त्रप्रमाणे नवग्रह शांती, नक्षत्र, दोष तसेच व्यतिपात, अतिगंड, गंड या योगांवर व विष्टी करणावर जन्म झाला असल्यास त्याचीही
शांती करावी लागते. याशिवाय इतर दोष जसे सिनीवाली कुहु, कृष्णचतुर्दशी, दर्शतिथी, क्षयतिथी, त्रीक प्रसव, सदंत जन्म, एक नक्षत्र, विषकन्या, पुत्र यमल शांती, जनन शांती केली जाते. जन्मकुंडलीतील दोषाप्रमाणे दैविक उपाय
केले जातात. याबाबत आण्णा विनामूल्य मार्गदर्शन करतात.
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.)
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६
फोन -
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत
व्यतिपात योग शांती
ReplyDeleteIs there a Pune address ?
ReplyDeletePune address please give ....
Delete