Thursday, 30 July 2015

मानवी जीवन समृध्द करण्यासाठी वास्तुशास्त्र आजच्या काळाची वाढती गरज

सदन, गृह हे शब्द माणसाच्या मनात फक्त प्रेम, आनंद, जिव्हाळा निर्माण करतात. या घरातच मानवी जीवनाचे पूर्ण विश्वच साकारले जाते, आकार घेते आणि त्याचे कुटुंबात रुपांतर होते. माणूस हा घरावेडा प्राणी आहे. हे घर माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक सुख-दु:खाचे हे घरच एकमेव साक्षीदार असते. 
आपल्या सर्वसामान्य माणसांचे जीवन अगदी चाकोरीबध्द असते. उदा. सांगायचे झालेच तर, असे म्हणता येईल की प्रथम शिक्षण मग नोकरी, मग विवाह आणि मग आपल्या गरजेनुसार शक्य झाल्यास एक - दोन खोल्यांचे आपण घर घेतो पण हे घर घेतानाही माणसाला अनेक खर्चांवर पाणी सोडून व्कचित आपल्या इच्छांना कुठेतरी मुरड घालून, काटकसर करून, आपल्या काही महत्त्वाकांक्षांचा बळी देऊन, वेळ प्रसंगी पोटाला चिमटा देत, बॅंकांकडून अथवा एखाद्या पतसंस्थेतून कर्ज घेऊन आपले घरकुलाचे स्वप्न पुरे करावे लागते. आपले घर घेऊन झाले अथवा बांधून झाले असे आपण समजू पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे घर घेताना आपण एवढ्या कष्टातून मार्ग काढला ते घर घेताना एखाद्या वास्तुतज्ञाचे मार्गदर्शन / सल्ला घेतला का? ज्या  घरात आपण राहणार आहोत त्या घरात मुले मोठी झाल्यावर आपल्याला सांभाळतील का? मुलांची लग्नं वेळेवर होतील का? या घरात पैशाची आवक चांगली राहील का? या घरातील नातेसंबंध चांगले टिकून राहतील का? या घरात आपला संसार फुलेले का? सुखाचा होईल का? जर आपण एखाद्या वास्तुतज्ञाचे मार्गदर्शन अथवा सल्ला घेतला असाल, त्याच्याकडून वास्तुची पडताळणी करून घेतली असेल तर या सर्वांची उत्तरे आपल्याला मिळाली असतीलच पण तसे आपणाकडून केले गेले नसेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच राहिली असावीत असे मला वाटते. 

सज्जनहो, आपण जर वास्तुशास्त्रानुरूप घरामध्ये वास्तव्य करीत नसाल तर आपल्या या लाडक्या घराला घरघर यायला वेळ लागणार नाही. आज आपण कितीही नाही - नाही म्हटले तरी आपले आरोग्य, यशापयश, किर्ती, पैसा, शैक्षणिक प्रगती, नातेसंबंध, कुटुंब प्रमुखाचे धैर्य, नेतृत्त्व, कर्तुत्त्व, प्रभुत्त्व, प्रशासन, प्रतिष्ठा पती -पत्नी सौख्य, कलह, अशांती, प्रगती, अधोगती या एक ना अनेक गोष्टींचा थेट संबंध वास्तूशी असतोच. हे शास्त्रानेही आता सिध्द करून दाखविले आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्त्व टिकविण्यासाठी मानवासहित सर्व प्राण्यांना निसर्गाशी मिळतेजुळते घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच एखाद्या वास्तूची निर्मिती करताना निसर्गाला अनुसरून केलेली रचना ही नेहमीच शुभ फलदायी ठरते. तर निसर्गाच्या विरुध्द जाऊन जर रचना केली तर त्याचे परिणाम हे माणसाला भोगावेच लागतात. 
    आज बहुतेक वास्तूंचे बांधकाम करताना चित्र-विचित्र पध्दतीने त्याला कट्स दिले जातात, जेणेकरून वास्तू अत्यंत सुशोभित व आकर्षक वाटेल. परंतु भारतीय वास्तुशास्त्रानुसार घराला जेवढे कट तेवढी घरात कटकट असा साधासोपा नियम आहे. परंतु आज वास्तु कशी सुशोभित करता येईल ? त्यासाठी जास्तीत जास्त जागेचा कसा उपयोग करून घेता येईल? मग ती जागा स्मशानाच्या शेजारची असो, तलावाच्या शेजारची असो अथवा मंदिराच्या समोरची असो जागेचा पुरेपुर उपयोग करून घेणे एवढेच उद्दीष्ट बांधकामतज्ञासमोर असते मग तेथे रहायला येणारा माणूस कळसाला पोहोचो अथवा रसातळाला या लोकांना त्याचे काही देणे - घेणे नाही. परंतु सज्जनहो, तुम्ही श्रम घेऊन जमविलेला आपला कष्टाचा पैसा कुठे गुंतवावा याचाही जरा विचार करावा. आपल्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीला काही अर्थ असूद्यात ! जेणेकरून तुमच्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीलाही काही अर्थ प्राप्त होईल. 
  वाचकहो, आज ऊठसूठ कोणीही वास्तुशास्त्रावर लिहू लागला आहे. आज बाजारात एक दोन पुस्तके सोडली तर तोतयेच जास्त पसरले आहेत. काही बाजारातली वास्तुशास्त्राची चार पुस्तके वाचून वास्तुतज्ञ बनले आहेत. आज लोकांचा या वास्तुशास्त्रावरील विश्वास ढासळतो आहे. याला कारण वास्तुनियमांच्या अर्धवट ज्ञानामुळे किंवा अर्धवट ज्ञानाने दिल्या गेलेल्या सल्ल्यांमुळे सामान्य माणूस अडचणीत सापडतो आहे. 
वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांवर आधारित एक महान शास्त्र आहे. ही एक तपश्चर्या, साधना आहे. या शास्त्राचा उपयोग रामायण - महाभारताच्या काळाच्या आधीपासून होत असल्याचे आढळून आले आहे. भारत ते श्रीलंका हा रामायण काळातला सेतू विश्वकर्मा यांच्या मुलाच्या म्हणजेच नल या वास्तुशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार बांधला गेला असल्याचे पुराण सांगते. व्दारका नगरी देवलोकांचा वास्तुतज्ञ 'विश्वकर्मा' याने वसविली होती. तर आयोध्द्या नगरीची रचना मनूने केली होती. महाभारतातल्या 'कांचनवन' व पांडवांच्या 'इंद्रप्रस्थ' नगरीचा निर्माणकर्ता म्हणून असुरांचा वास्तुतज्ञ 'मयासुर' याला ओळखले जाते. हे सांगायचे कारण एवढेच की या वास्तुशास्त्राला दहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. हे शास्त्र आजच जन्माला आलेले नाही. जे लोक या शास्त्राला थोतांड समजतात, अपुऱ्या ज्ञानातून लोकांची दिशाभूल करतात त्यांनी जाड भिंगाचे चष्मे लावून पुराणे जरूर वाचावीत. स्कंद पुराण, अग्नि पुराण, वायु पुराण, गरूड पुराण, नारद पुराण, मत्स्य पुराण, मानसार, शिल्परत्न, विश्वकर्म प्रकाश, बृहत्संहिता, वास्तुविद्या इ. अनेक ग्रंथांची यादीच देता येईल. 
 वाचकहो, वास्तुशास्त्र हे अथांग सागरासारखे आहे. माझ्या ओंजळीतून त्यातले चार थेंब तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न केला आहे. या शास्त्रावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका हा तुमचा ऐच्छीक विषय आहे. त्यावर माझी कोणत्याही दोषी वास्तूमध्ये राहून तुमचे नुकसान होऊ नये, सर्वांचे कल्याण व्हावे एवढीच तळमळ उराशी बाळगून सदैव कार्यरत असतो. एखाद्या चुकीच्या जागेवर विव्दान बसलेला असल्यास त्याच्या वाट्याला दु:ख, दारिद्रय, मानहानी, अपमान या गोष्टी येतात. याउलट योग्य जागी बसलेला एखादा बुध्दीहीन हा सर्व बुध्दीमान लोकांच्या सभेत प्रमुख पाहुणा म्हणून मिरविण्याचा मान त्याला मिळतो. फरक असतो तो फक्त जागेचाच. 
 वाचकहो, या वास्तुशास्त्राच्या सहाय्याने आपण आपले सुख - समाधान - शांती वृध्दींगत करू शकतो. आपली राहती वास्तू जर शास्त्राला अनुसरून असेल तर पूर्व कर्मानुसार भोगावयांची जी फळे आहेत त्यांची तिव्रता यातून कमी होईल. प्रत्येकाच्या कर्मानुसार लिहिलेले विधिलिखीत आपण टाळू शकत नाही. पण सुखामागून येणारे जे दु:ख आहे ते चार दिवस थांबवून सुखाचे चार दिवस या शास्त्राच्याअवलंबनाने नक्कीच वाढवू शकतो एवढेच मी म्हणेन 
धन्यवाद !                               
             
- सौ.गायत्री पाटोळे 
वास्तुविशारद तज्ञ 
मो. ९२२१२५०४०४ -
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत

No comments:

Post a Comment