Wednesday, 17 June 2015

आमच्याकडे पूजा करण्यामध्ये, इतरांपेक्षा वेगळे काय?

शांतीपूजा म्हणजे नेमके काय?
आमच्याकडे पूजा करण्यामध्ये, इतरांपेक्षा वेगळे काय?
  सतत बारा वर्षे असंख्य कुंडल्यांचा अभ्यास करून, गायत्री उपासक अण्णांनी सर्वसाधारण दोषांचे संकलन केले आहे. हे एकूण २७ दोष आहेत. त्यांची यादी आमचे लेटरहेडवर छापली आहे. त्या पत्रिकांचा अभ्यास करताना अण्णांना असे आढळून आले की, शेकडा ९०% माणसांचे पत्रकेमध्ये कालसर्प दोष आणि पितृदोष येतो. म्हणून आम्ही आमच्या शांतीपूजा पॅकेजमध्ये नेहमीचे गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदी श्राध्दाबरोबर कालसर्प शांती पूजेस अग्रक्रम दिला आहे. त्यानंतर किंवा कुठल्याही पूजे अगोदर 'गोमुख प्रसव शांती' करणेचे विधान आहे. म्हणून प्रत्येकाची गोमुख प्रसव शांती सुरुवातीस केली जाते. 
कालसर्प शांती नंतर यजमानाचे पत्रिकेतील इतर जनन दोष जसे नक्षत्र, तिथी, योग करणे मंगळ दोष यांची शांती पंचोपचार पूजनाने केली जाते. त्यानंतर इतर दोषांसाठी आणि कालसर्प शांतीमधील प्रमुख देवता सर्प तसेच नवनाग यांची आद्यदेवता भवानी शंकर अर्थात महारूद्द देवतेस दूधाचा रुद्राभिषेक केला जातो. नंतर नवग्रह शांती केली जाते. कारण प्रत्येकाचे पत्रिकेत (मूळ किंवा गोचर) कोणीना कोणी ग्रह प्रतिकूल असतोच. म्हणून 'नवग्रहशांती' आम्ही करतो. 

उदक शांतीचे महात्म्य 
   सर्वात महत्त्वाचा फरक आमचे येथे जो दिसतो तो आहे. उदक शांती, कालसर्प शांती करणे गरजेचेअसते. नाहीतर कालसर्प शांतीचे शुभफळ मिळत नाही. ज्यावेळेस एखादा माणूस आमच्याकडे येतो आणि असे सांगतो की आम्ही नाशिकला जाऊन शांती केली पण काहीच फायदा झाला नाही. त्यावेळेला आमच्या असे निदर्शनास आले की, त्या व्यक्तीने घरी येऊन उदक शांती  केलेली नसते. हे लक्षात घेऊन, आम्ही आमच्या पॅकेजमध्ये उदकशांतीचा प्रयोग अंतर्भूत केला आहे. त्यामुळे एक तर त्याचा खर्च व वेळ तर वाचतोच पण पूजेचे फळही तात्काळ मिळते. 

अनिष्ट ग्रहांचे जप 
आमच्याकडे शांतीपूजा करणेचा अजून एक फायदा असा असतो की, आम्ही पूजा केल्यानंतर अनिष्ठ ग्रहांचे जपही दुसऱ्या ब्राह्मणांकडून करवून घेतो. कालसर्प शांतीचे फळ न मिळालेल्या लोकांनी ग्रहांचे जप केलेले नसतात. जप केला म्हणजे ग्रह संतुष्ट होतात आणि आपली कृपा ठेवतात. म्हणून आम्ही प्रत्येक यजमानाने पत्रिकेतील अनिष्ट ग्रहांचे जप करतो. हे जप ३ ते ६ महिने या कालावधीत पुरे होतात. 
कालसर्प शांती ही इतर जननशांती कर्मासारखीच सर्व सामान्य शांती आहे. त्यामुळे ही शांतीसुध्दा इतर शांतीप्रमाणे स्वत:चे घरी किंवा शंकराचे देवळात किंवा जलाशयाजवळ / गोशाळेत जाणेचे गरज नाही. असे धर्मसिंधू आणि शांतीकर्म या पुस्तकात नमूद केले आहे. नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राध्द मात्र फक्त नाशिक येथेच होते. ते इतर कुठेही करता येत नाहीत. त्यासाठी त्र्यंबकेश्र्वर येथेच जावे लागते. 

अण्णांचे वेगळेपण काय आहे
मोफत सल्ला, शांती कुठूनही करणेची मुभा, शांती केल्यानंतर तोंड न लपवता, यजमानास सतत संपर्कात राहणेस सांगणे, पूजा केल्यानंतर यजमानास मिळणारे त्वरीत फळ. या सर्वांपेक्षा आणखी एक गोष्ट गायत्री उपासक अण्णांकडे अधिक आहे ती म्हणजे कुठल्याही रोगावर किंवा बाधेवर होणारे उपचार. हे उपचार देखील अण्णा विनामूल्य करतात. ज्या व्यक्ती अत्यवस्थ घरी किंवा हॉस्पिटलमध्ये असतात, जेणेकरून अण्णांकडे येऊ शकत नाहीत अशांचे उपचारासाठी अण्णा स्वत: त्याठिकाणी जातात. त्याबदल्यात कशाचीही अपेक्षा ते ठेवीत नाहीत. फक्त त्यांचे वेळेनुसार ते जातात. हे कर्म ते अत्यंत निरपेक्ष भावनेने करतात. त्यामुळे कित्येक जणांचे मनामध्ये, गायत्री उपासक अण्णांचे, स्थान देवापेक्षाही वरचे आहे, हेही तितकेच खरे… 
                                                                                    शब्दांकान- सुधीर गुरुजी     
                                                  

कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत

प्रगती ज्योतिष विषयी


 'समस्या नाही असा मनुष्य नाही, उपाय नाही अशी समस्या नाही' देवाने जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण केली. त्याचवेळीस सर्वांचे पालनपोषणाची जबाबदारीही त्याने घेतली आहे. त्याने जीवाला जगावयास लागणाऱ्या साधनांची अगोदर निर्मिती केली आणि मगच जीव जन्माला घातले. प्रथम स्त्रीचे स्तनांमध्ये दूध निर्माण होते आणि मगच बाळाचा जन्म होतो. याचधर्तीवर, जीवावर येणारी संकटे किंवा त्याला भेडसावणाऱ्या समस्यांवरील उपाय देवाने आधीच योजले आहेत. दुसऱ्या भाषेत असेही म्हणता येईल की, ज्यावेळेस कुलूप तयार होते. त्याचवेळेस ते कुलूप उघडणाऱ्या चाव्याही तयार होतात. ज्याप्रमाणे प्रत्येक कुलूपास चावी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. कुठेतरी वाचलेले हे वाक्य. गायत्री उपासक अण्णांनी आपले घोष वाक्य बनवले आहे. फक्त प्रश्न एवढाच असतो की, योग्य माणूस भेटून त्याने योग्य सल्ला देणे. गायत्री उपासक अण्णा हे कार्य गेली अनेक वर्षे करीत आहेत. तेही विनामूल्य. कशाचीही अपेक्षा न ठेवता. निरपेक्ष बुध्दीने अण्णांनी हे व्रत चालवले आहे.

आमची कार्यप्रणाली 
    प्रगती ज्योतिषमध्ये गायत्री उपासक अण्णा विनामूल्य म्हणजेच मोफत ज्योतिषविषयक सल्ला देतात. हा सल्ला फोनवरून दिला जात नाही. त्याचप्रमाणे जन्मकुंडली घेऊन प्रत्यक्ष भेट घ्यावी लागते. घरातील प्रत्येक व्यक्तीने भेट घेणे आवश्यक नाही. कुणीही एक व्यक्ती घरातील सर्वांच्या पत्रिका दाखवून प्रत्येकासाठी स्वतंत्र सल्ला घेऊ शकते. 

जन्मपत्रिका घेऊन अण्णांकडे ऑफिसमध्ये माणूस आला की, प्रथम त्याचे पत्रिकेतील आम्हाला आवश्यक असलेला मजकूर-तपशील आम्ही आमच्या लेटरहेडवर उतरवून घेतो. तुमच्याकडे जर जन्मपत्रिका नसेल तर तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण विचारून ५ मिनिटात पत्रिका तयार करून देतो. यासाठी मात्र नाममात्र ५०/- आकार घेतला जातो. पेपर (लेटरहेड) तयार झाले म्हणजे रांगेत बसून घ्यायचे आणि आपला नंबर आला की अण्णांपुढे जाऊन बसायचे. त्यांना आपल्या समस्या सांगायच्या. पत्रिका बघून अण्णा त्याच पेपरवर, त्यातील दोष लिहून देतात. त्याला आमच्याकडे लागणारा खर्चही लिहून दिला जातो. सदर दोष काढणेची शांतीपूजा तुम्ही कुठूनही कोणाकडूनही करून घेऊ शकता. आमच्याकडेच पूजा करा असा आग्रह नसतो. लोकांची सोय व्हावी. त्यांना गुरुजी बघणे, साहित्य गोळा करणे वगैरेसाठी लागणारा वेळ वाचावा, यादृष्टीने पूजेची सोय आम्ही आमच्याकडे ठेवली आहे इतकेच. तथापि बहुतेक लोक अण्णांच्याकडेच पूजा करणे पसंत करतात, ही गोष्ट वेगळी. 

***
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत

Tuesday, 16 June 2015

मी गायत्री उपासक अण्णा


नमस्कार मित्रांनो,

नेपाळचा भूकंप असो वा केदारनाथ येथील महाजलप्रलय. मानवाने कितीही प्रगती केली तरी देखील त्यास अशा काही प्रसंगी हतबल व्हावं लागतं. या संकटांमागे काही कारणे मानवी असतात पण काही आपल्या आकलनाच्या पलिकडे. अगदी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील उदाहरणेच घ्या. परिक्षेचा पेपर नीट जाईल का? कामामध्ये प्रमोशन मिळेल का? आपल्या मुलाला वा मुलीला योग्य स्थळ मिळेल का? प्रेमविवाह होईल का? घरातील एखाद्या व्यक्तीला झालेला असाध्य आजार बरा होईल का? असे नानाविध समस्या आपल्या प्रत्येकाला भेडसावत असतात. या समस्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी मग आपण गंडेदोरे बांध, हा मंत्र जप, तो मंत्र हजारवेळा लिही, देवाकडे अनवाणी चालत जा असे नानाविध प्रकार करत असतो. एवढं सगळं करुन देखील पदरी निराशाच येते कारण समस्या जैसे थे तशीच असते. पण खरंतर जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही जिला समस्या नाहीत आणि जगात अशी कोणतीच समस्या नाही ज्यावर उपाय नाही. हे जीवनाचं खरं सार मांडलं आहे प्रगती ज्योतिष अण्णा यांनी.
प्रगती ज्योतिष गायत्री उपासक अण्णा
अण्णांचे मूळ नाव विठ्ठल. पंढरपूर येथे २० एप्रिल १९५३ साली एका व्यापारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९७३ साली ते पंढरपूर येथील महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले. काही काळ ते तहसिल कार्यालयात पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होते. सगळं सुरळीत चालू असतानाच १९७८ साली एक असा प्रसंग आला आणि अण्णा या क्षेत्रात आले. निमित्त ठरले त्यांच्या बहिणीच्या मानसिक आजाराचा. अनेक उपचार झाले तरी काही गुण आला नाही. कोणीतरी अण्णांना गायत्री उपासकाकडे घेऊन गेले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेऊन मंत्रोपचार केला आणि अण्णांची बहीण खडखडीत बरी झाली. यामागचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी अण्णा त्या गृहस्थांकडे परत गेले. त्या गृहस्थांनी त्यांचे गुरु ब्रह्मानंद घोडके गुरुजी यांच्याकडे अण्णांना नेले. त्यावेळी गुरुजी आजारी होते. अण्णांनी त्यांची मनापासून सेवा केली. दुर्दैवाने १९९२ साली घोडके गुरुजींनी देह ठेवला. तत्पूर्वी अण्णांना त्यांनी आपला आशीर्वाद दिला, काही मंत्र दिले त्याचबरोबर या सिद्धींचा मोफत वापर करण्याचा शब्दही मागितला. दरम्यानच्या काळात अण्णांनी गायत्री उपासना केली तसेच पारंपारिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. रुग्णांवरचे उपचार आणि ज्योतिषाचा सल्ला या दोन्ही सेवा मी मोफत देईन हा घोडके गुरुजींना दिलेला शब्द अण्णा आजदेखील पाळत आहेत.
पंढरपूरमध्ये राहून अण्णांनी असंख्य कुंडलांचा अभ्यास केला आणि ठळक असे २७ दोष शोधून काढले. २००१ मध्ये अण्णा नेसत्या वस्त्रांनिशी पुण्यात आले, झोपडपट्टीत राहिले. तेथील तळागाळातल्या लोकांची सेवा केली. त्यांचे आशीर्वाद घेतले.
गेल्या दशकभरात अण्णांमुळे असंख्य लोक रोगमुक्त झाले. अनेकांची आर्थिक संकटातून मुक्तता झाली. कितीतरी लोकांना त्यांनी खोट्या खटल्यांमधून बाहेर काढले. अगणित लोकांची लग्ने जमली. बऱ्याच जोडप्यांना संततीसुख लाभले. त्याचप्रमाणे पती-पत्नींमधील विसंवाद मिटवणे, मुलांच्या शैक्षणिक समस्या, मुलींची सासुरवासातून मुक्तता, हरविलेल्या वस्तू सापडणे, घरातून निघून गेलेल्या व्यक्ती घरी परतणे, घरातील भांडणे मिटणे यांसारख्य़ा अनंत समस्यांचे निराकरण अण्णांनी केले आहे.

अण्णांचे वास्तव्य पुणे आणि कल्याण अशा दोन्ही ठिकाणी असते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ते पुण्यात असतात आणि सोळा ते तीस असा दुसरा पंधरवडा ते कल्याणला असतात. प्रत्येक अमावास्येला मात्र ते पुण्याला असतात. अमावास्येला त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असते

कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत