शांतीपूजा म्हणजे नेमके काय?
आमच्याकडे पूजा करण्यामध्ये, इतरांपेक्षा वेगळे काय?
सतत बारा वर्षे असंख्य कुंडल्यांचा अभ्यास करून, गायत्री उपासक अण्णांनी सर्वसाधारण दोषांचे संकलन केले आहे.
हे एकूण २७ दोष आहेत. त्यांची यादी आमचे लेटरहेडवर छापली आहे. त्या पत्रिकांचा
अभ्यास करताना अण्णांना असे आढळून आले की, शेकडा ९०%
माणसांचे पत्रकेमध्ये कालसर्प दोष आणि पितृदोष येतो. म्हणून आम्ही आमच्या
शांतीपूजा पॅकेजमध्ये नेहमीचे गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदी श्राध्दाबरोबर कालसर्प शांती पूजेस
अग्रक्रम दिला आहे. त्यानंतर किंवा कुठल्याही पूजे अगोदर 'गोमुख प्रसव शांती' करणेचे विधान
आहे. म्हणून प्रत्येकाची गोमुख प्रसव शांती सुरुवातीस केली जाते.
कालसर्प शांती नंतर यजमानाचे पत्रिकेतील इतर जनन दोष जसे
नक्षत्र, तिथी, योग करणे मंगळ
दोष यांची शांती पंचोपचार पूजनाने केली जाते. त्यानंतर इतर दोषांसाठी आणि कालसर्प
शांतीमधील प्रमुख देवता सर्प तसेच नवनाग यांची आद्यदेवता भवानी शंकर अर्थात
महारूद्द देवतेस दूधाचा रुद्राभिषेक केला जातो. नंतर नवग्रह शांती केली जाते. कारण
प्रत्येकाचे पत्रिकेत (मूळ किंवा गोचर) कोणीना कोणी ग्रह प्रतिकूल असतोच. म्हणून 'नवग्रहशांती' आम्ही करतो.
उदक शांतीचे महात्म्य
सर्वात महत्त्वाचा फरक आमचे येथे जो दिसतो तो आहे.
उदक शांती, कालसर्प शांती करणे गरजेचेअसते. नाहीतर कालसर्प
शांतीचे शुभफळ मिळत नाही. ज्यावेळेस एखादा माणूस आमच्याकडे येतो आणि असे सांगतो की
आम्ही नाशिकला जाऊन शांती केली पण काहीच फायदा झाला नाही. त्यावेळेला आमच्या असे
निदर्शनास आले की, त्या व्यक्तीने घरी येऊन उदक शांती केलेली
नसते. हे लक्षात घेऊन, आम्ही आमच्या पॅकेजमध्ये उदकशांतीचा प्रयोग अंतर्भूत
केला आहे. त्यामुळे एक तर त्याचा खर्च व वेळ तर
वाचतोच पण पूजेचे फळही तात्काळ मिळते.
अनिष्ट ग्रहांचे जप
आमच्याकडे शांतीपूजा करणेचा अजून एक फायदा असा असतो की, आम्ही पूजा केल्यानंतर अनिष्ठ ग्रहांचे जपही दुसऱ्या
ब्राह्मणांकडून करवून घेतो. कालसर्प शांतीचे फळ न मिळालेल्या लोकांनी ग्रहांचे जप
केलेले नसतात. जप केला म्हणजे ग्रह संतुष्ट होतात आणि आपली कृपा ठेवतात. म्हणून
आम्ही प्रत्येक यजमानाने पत्रिकेतील अनिष्ट ग्रहांचे जप करतो. हे जप ३ ते ६ महिने
या कालावधीत पुरे होतात.
कालसर्प शांती ही इतर जननशांती कर्मासारखीच सर्व सामान्य
शांती आहे. त्यामुळे ही शांतीसुध्दा इतर शांतीप्रमाणे स्वत:चे घरी किंवा शंकराचे
देवळात किंवा जलाशयाजवळ / गोशाळेत जाणेचे गरज नाही. असे धर्मसिंधू आणि शांतीकर्म या
पुस्तकात नमूद केले आहे. नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राध्द मात्र फक्त नाशिक
येथेच होते. ते इतर कुठेही करता येत नाहीत. त्यासाठी त्र्यंबकेश्र्वर येथेच जावे
लागते.
अण्णांचे वेगळेपण काय आहे?
मोफत सल्ला, शांती कुठूनही
करणेची मुभा, शांती केल्यानंतर तोंड न लपवता, यजमानास सतत संपर्कात राहणेस सांगणे, पूजा केल्यानंतर यजमानास मिळणारे त्वरीत फळ. या
सर्वांपेक्षा आणखी एक गोष्ट गायत्री उपासक अण्णांकडे अधिक आहे ती म्हणजे कुठल्याही
रोगावर किंवा बाधेवर होणारे उपचार. हे उपचार देखील अण्णा विनामूल्य करतात. ज्या
व्यक्ती अत्यवस्थ घरी किंवा हॉस्पिटलमध्ये असतात, जेणेकरून
अण्णांकडे येऊ शकत नाहीत अशांचे उपचारासाठी अण्णा स्वत: त्याठिकाणी जातात.
त्याबदल्यात कशाचीही अपेक्षा ते ठेवीत नाहीत. फक्त त्यांचे वेळेनुसार ते जातात. हे
कर्म ते अत्यंत निरपेक्ष भावनेने करतात. त्यामुळे कित्येक जणांचे मनामध्ये, गायत्री उपासक अण्णांचे, स्थान
देवापेक्षाही वरचे आहे, हेही तितकेच खरे…
शब्दांकान- सुधीर गुरुजी
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.)
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६
फोन -
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६
फोन -
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत
No comments:
Post a Comment