'समस्या नाही असा
मनुष्य नाही, उपाय नाही अशी
समस्या नाही' देवाने जेव्हा
पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण केली. त्याचवेळीस सर्वांचे पालनपोषणाची जबाबदारीही
त्याने घेतली आहे. त्याने जीवाला जगावयास लागणाऱ्या साधनांची अगोदर निर्मिती केली
आणि मगच जीव जन्माला घातले. प्रथम स्त्रीचे स्तनांमध्ये दूध निर्माण होते आणि मगच
बाळाचा जन्म होतो. याचधर्तीवर, जीवावर येणारी
संकटे किंवा त्याला भेडसावणाऱ्या समस्यांवरील उपाय देवाने आधीच योजले आहेत.
दुसऱ्या भाषेत असेही म्हणता येईल की, ज्यावेळेस कुलूप
तयार होते. त्याचवेळेस ते कुलूप उघडणाऱ्या चाव्याही तयार होतात. ज्याप्रमाणे
प्रत्येक कुलूपास चावी असते, त्याचप्रमाणे
प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. कुठेतरी वाचलेले हे वाक्य. गायत्री उपासक अण्णांनी
आपले घोष वाक्य बनवले आहे. फक्त प्रश्न एवढाच असतो की, योग्य माणूस
भेटून त्याने योग्य सल्ला देणे. गायत्री उपासक अण्णा हे कार्य गेली अनेक वर्षे
करीत आहेत. तेही विनामूल्य. कशाचीही अपेक्षा न ठेवता. निरपेक्ष बुध्दीने अण्णांनी
हे व्रत चालवले आहे.
आमची
कार्यप्रणाली
प्रगती
ज्योतिषमध्ये गायत्री उपासक अण्णा विनामूल्य म्हणजेच मोफत ज्योतिषविषयक सल्ला
देतात. हा सल्ला फोनवरून दिला जात नाही. त्याचप्रमाणे जन्मकुंडली घेऊन प्रत्यक्ष
भेट घ्यावी लागते. घरातील प्रत्येक व्यक्तीने भेट घेणे आवश्यक नाही. कुणीही एक
व्यक्ती घरातील सर्वांच्या पत्रिका दाखवून प्रत्येकासाठी स्वतंत्र सल्ला घेऊ शकते.
जन्मपत्रिका घेऊन
अण्णांकडे ऑफिसमध्ये माणूस आला की, प्रथम त्याचे
पत्रिकेतील आम्हाला आवश्यक असलेला मजकूर-तपशील आम्ही आमच्या लेटरहेडवर उतरवून
घेतो. तुमच्याकडे जर जन्मपत्रिका नसेल तर तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि
जन्मठिकाण विचारून ५ मिनिटात पत्रिका तयार करून देतो. यासाठी मात्र नाममात्र ५०/-
आकार घेतला जातो. पेपर (लेटरहेड) तयार झाले म्हणजे रांगेत बसून घ्यायचे आणि आपला
नंबर आला की अण्णांपुढे जाऊन बसायचे. त्यांना आपल्या समस्या सांगायच्या. पत्रिका
बघून अण्णा त्याच पेपरवर, त्यातील दोष
लिहून देतात. त्याला आमच्याकडे लागणारा खर्चही लिहून दिला जातो. सदर दोष काढणेची
शांतीपूजा तुम्ही कुठूनही कोणाकडूनही करून घेऊ शकता. आमच्याकडेच पूजा करा असा
आग्रह नसतो. लोकांची सोय व्हावी. त्यांना गुरुजी बघणे, साहित्य गोळा
करणे वगैरेसाठी लागणारा वेळ वाचावा, यादृष्टीने
पूजेची सोय आम्ही आमच्याकडे ठेवली आहे इतकेच. तथापि बहुतेक लोक अण्णांच्याकडेच
पूजा करणे पसंत करतात, ही गोष्ट वेगळी.
***
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.)
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६
फोन -
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.)
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६
फोन -
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत
No comments:
Post a Comment