नमस्कार मित्रांनो,
नेपाळचा भूकंप
असो वा केदारनाथ येथील महाजलप्रलय. मानवाने कितीही प्रगती केली तरी देखील त्यास
अशा काही प्रसंगी हतबल व्हावं लागतं. या संकटांमागे काही कारणे मानवी असतात पण काही
आपल्या आकलनाच्या पलिकडे. अगदी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील उदाहरणेच घ्या. परिक्षेचा पेपर नीट जाईल का? कामामध्ये प्रमोशन मिळेल का? आपल्या मुलाला वा मुलीला योग्य स्थळ मिळेल का? प्रेमविवाह होईल का? घरातील एखाद्या व्यक्तीला झालेला असाध्य आजार
बरा होईल का? असे नानाविध समस्या आपल्या प्रत्येकाला भेडसावत असतात. या समस्यांपासून सुटका करुन घेण्यासाठी मग आपण
गंडेदोरे बांध, हा मंत्र जप, तो मंत्र हजारवेळा लिही, देवाकडे अनवाणी चालत जा असे नानाविध प्रकार करत
असतो. एवढं सगळं करुन
देखील पदरी निराशाच येते कारण समस्या जैसे थे तशीच असते. पण खरंतर जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही जिला
समस्या नाहीत आणि जगात अशी कोणतीच समस्या नाही ज्यावर उपाय नाही. हे जीवनाचं खरं सार मांडलं आहे प्रगती ज्योतिष
अण्णा यांनी.
![]() |
प्रगती ज्योतिष गायत्री उपासक अण्णा |
अण्णांचे मूळ नाव
विठ्ठल. पंढरपूर येथे २०
एप्रिल १९५३ साली एका व्यापारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९७३ साली ते पंढरपूर येथील महाविद्यालयातून
वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले. काही काळ ते तहसिल कार्यालयात पुरवठा अधिकारी
म्हणून कार्यरत होते. सगळं सुरळीत चालू असतानाच १९७८ साली एक असा प्रसंग आला आणि अण्णा या क्षेत्रात
आले. निमित्त ठरले
त्यांच्या बहिणीच्या मानसिक आजाराचा. अनेक उपचार झाले तरी काही गुण आला नाही. कोणीतरी अण्णांना गायत्री उपासकाकडे घेऊन गेले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेऊन मंत्रोपचार
केला आणि अण्णांची बहीण खडखडीत बरी झाली. यामागचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी
अण्णा त्या गृहस्थांकडे परत गेले. त्या गृहस्थांनी त्यांचे गुरु ब्रह्मानंद घोडके
गुरुजी यांच्याकडे अण्णांना नेले. त्यावेळी गुरुजी आजारी होते. अण्णांनी त्यांची मनापासून सेवा केली. दुर्दैवाने १९९२ साली घोडके गुरुजींनी देह
ठेवला. तत्पूर्वी
अण्णांना त्यांनी आपला आशीर्वाद दिला, काही मंत्र दिले त्याचबरोबर या सिद्धींचा मोफत
वापर करण्याचा शब्दही मागितला. दरम्यानच्या काळात अण्णांनी गायत्री उपासना
केली तसेच पारंपारिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. रुग्णांवरचे उपचार आणि ज्योतिषाचा सल्ला या
दोन्ही सेवा मी मोफत देईन हा घोडके गुरुजींना दिलेला शब्द अण्णा आजदेखील पाळत आहेत.
पंढरपूरमध्ये
राहून अण्णांनी असंख्य कुंडलांचा अभ्यास केला आणि ठळक असे २७ दोष शोधून काढले. २००१ मध्ये अण्णा नेसत्या वस्त्रांनिशी पुण्यात
आले, झोपडपट्टीत
राहिले. तेथील
तळागाळातल्या लोकांची सेवा केली. त्यांचे आशीर्वाद घेतले.
गेल्या दशकभरात
अण्णांमुळे असंख्य लोक रोगमुक्त झाले. अनेकांची आर्थिक संकटातून मुक्तता झाली. कितीतरी लोकांना त्यांनी खोट्या खटल्यांमधून
बाहेर काढले. अगणित लोकांची लग्ने जमली. बऱ्याच जोडप्यांना संततीसुख लाभले. त्याचप्रमाणे पती-पत्नींमधील विसंवाद मिटवणे, मुलांच्या शैक्षणिक समस्या, मुलींची सासुरवासातून मुक्तता, हरविलेल्या वस्तू सापडणे, घरातून निघून गेलेल्या व्यक्ती घरी परतणे, घरातील भांडणे मिटणे यांसारख्य़ा अनंत समस्यांचे
निराकरण अण्णांनी केले आहे.
अण्णांचे
वास्तव्य पुणे आणि कल्याण अशा दोन्ही ठिकाणी असते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ते
पुण्यात असतात आणि सोळा ते तीस असा दुसरा पंधरवडा ते कल्याणला असतात. प्रत्येक अमावास्येला मात्र ते पुण्याला असतात. अमावास्येला त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असते.
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.)
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६
फोन -
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.)
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६
फोन -
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत
No comments:
Post a Comment