Monday, 3 August 2015

गायत्री उपासक आण्णा


समस्या नाही असा मनुष्य नाही !
उपाय नाही अशी समस्या नाही !


ज्योतिषशास्त्रमध्ये भविष्य वर्तविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यात अग्रकमावर जन्मकुंडलीचा मार्ग आहे. त्यानंतर हस्तसामुद्रिक, अंकशास्त्र, फेस रीडिंग, नाडी ज्योतिष, रमल, टॅरोटकार्ड, मॅजिकबॉंल, स्वाक्षरी वरून, पाय बघून, भविष्य सांगणे यासारखे अनेक प्रकार आहेत.

गायत्री उपासक आण्णाच्या मते जन्मकुंडली हेच ज्योतिष्य जाणून घेण्याचे सर्वात उत्तम साधन आहे. कारण ते सर्वात प्राचीन आहे. हजारो वर्षापूर्वी भृगू  ऋषींनी स्रियांसाठी आणि पुरूषांसाठी असे दोन स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. ते  भृगूसंहिता म्हणून प्रसिध्द आहेत. या ग्रंथा  मध्ये जेवढ्या जन्मकुंडल्या भविष्यासह  मांडलेल्या  आहेत, त्या व्यक्तिरिक्त जगात कुणाचीच कुंडली असू शकत नाही ! म्हणजे आज पर्यंत जेवढे लोक जन्माला आले किवा येथून पुढे जन्माला येणार आहेत त्या सर्वांच्या कुंडल्या भृगू ऋषींनी हजारो वर्षापूर्वी तयार केल्या आहेत. इतके हे अचूक गणितावर आधारलेले शास्त्र आहे. म्हणून विश्वसनीय आणि जगमान्य आहे. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण यानुसार तयार केलेली कुंडली अचूक असते. त्यावर कुणाचेच दुमत नसते. कुंडलीमधील बारास्थाने व आकाशातील बारा ग्रह व त्यांची फलिते सर्वमान्य आहेत. इतर प्रकारामध्ये असे होत नाही. स्थलभिन्नत्व आणि व्यक्ती भिन्नत्वाप्रमाणे फलितांमध्ये फरक पडतो असा सार्वत्रिक अनुभव आहे. 
दुसरे असे की इतर प्रकारात भूत व भविष्य यावरच प्रकाश टाकता येतो. मग वर्तमानाचे काय? माणसाच्या जीवनातल्या आजच्या समस्या निवारणाचे उपाय शोधण्यासाठी जन्मकुंडलीच उपयोगी पडते. गायत्री उपासक आण्णा तुम्हाला तुमच्या भूतकाळातील घटना सांगून आश्चर्यचकित करीत नाहीत किवा भविष्यकालीन स्वप्न दाखवून तुमचे रंजनही करीत नाहीत ते विचारतात तुमची आजची समस्या काय आहे? त्याचे उत्तर जन्मकुंडलीत शोधून तुम्हाला मोफत सल्ला देतात. त्यासाठी शांतीपूजा व होमहवन आणि मंत्रजप असे सात्विक, शाश्वत आणि बिनधोक, धार्मिक मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे तुम्ही जरी समस्यांच्या चिखलात आकंठ बुडालेला असलात तरी आण्णाच्या संपर्कात आल्यानंतर कमळाप्रमाने हसू लागता!! एक मात्र निश्चित आहे की त्यासाठी तुमची आण्णावर श्रध्दा  असायला हवी. म्हणजे तुम्हाला फळ मिळणार  ही  काळ्या दगडावरची रेघ  आहे पण तुमच्या श्रद्धेनुसार अवधीमध्ये कमी जास्त फरक पडणार! विशेष म्हणजे हे करीत असताना गायत्री उपासक आण्णांना, गंडे-दोरे, अंगारे-धुपारे, लिंबू-मिरची, खडे-रत्ने वगैरे वगैरे सारख्या कुबड्यांची गरज भासत नाही!! 
जारण-मारण-उच्चाटन-संमोहन-मूठ मारणे अशा अघोरी मार्गाचा अवलंब करणाऱ्याविषयी आण्णांना तिटकारा आहे!! असल्या समाजद्रोही मूठभर माणसामुळे मूळचे पवित्र शास्त्र हकनाक बदनाम होत आहे असे अण्णाचे  स्पष्ट  मत आहे. सतत एक तप असंख्य कुंडल्याचा अभ्यास करून आणि त्यांच्या फलितांचा पडताळा पाहून गायत्री उपासक आण्णांनी ठळक असे दोष शोधून काढले आहेत. 
१) काळसर्प योग :   काळसर्प योग हा काल्पनिक आहे. या योगाचे जे अनेक प्रकार आहेत त्यांचा निकष लावायचा म्हटला तर शेकडो ९०% लोकांचे पत्रिकेत हा योग आढळून येईल. आमच्याकडे येणारा जातक बऱ्याच ठिकाणी फिरून आलेला अस्तो. त्यामुळे तोच आम्हाला योगाची शांती करण्याचा "मोफत" सल्ला देतो म्हणून आम्ही ही शांती करून देतो. 
२) मंगळ दोष, मंगळ-राहू विषयोग,मंगळ-रवि अंगार योग, मंगळ-शनि संघर्ष योग : जन्मकुंडलीमध्ये व्दादश, प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि अष्टम या स्थानांमध्ये मंगळ असेल तर तो मंगळदोष मानला जातो. हा मंगळ मुखत्वे करून विवाहकार्याला आडकाठी आणतो. मंगळाचा जप व हवन करून मंगळाची दाने दिली म्हणजे हा शांत होतो. 
कुंडलीमधील कुठल्याही स्थानामध्ये मंगळाबरोबर रवि असला तर अंगार योग होतो. कारण रवि व मंगळ हे दोन्ही अग्नी तत्वाचे व उष्ण प्रकृतीचे ग्रह आहेत. त्यामुळे जातकाच्या तापटपणाचा स्फोट होणारे प्रसंग वारंवार येतात. 
मंगळासह राहू असला तर विष योग होतो. असा जातक वैषयिक होतो. विषयोपभोगामागे  लागून स्वतःचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान करून घेतो. या मंगळाच्या साथीला शनी महाराज असले तर संघर्ष योग होतो. अशा माणसांना पदोपदी संघर्ष करावा लगतो. त्याशिवाय साधी गोष्टही  त्यांना सहजपणे साध्य करता येत नाही. अपमान आणि अपयश यांनी माणूस खचून जातो.    
३) गुरु - राहू चांडाळ योग : उच्चवर्णीय गुरूच्या संपर्कात मातंग जातीचा राहू आल्यावर चांडाळ योग होतो. याचे प्रमुख फलित म्हणजे आर्थिक संकटे योग्यतेपेक्षा कमी लाभ मिळालेला पैसा टिकत  नाही. दृष्ट लोकांचे संगतीमुळे आर्थिक नुकसान व मानहानी, कर्जबाजारी होणे असे परिणाम दिसतात. 
४) ग्रहण योग : राहू किवा केतूची चंद्र किवा रवि बरोबर युती झाली म्हणजे ग्रहण योग होतो. यामुळे माणसाच्या सुखाला ग्रहण लागते. रविमुळे अधिकार मिळतो. पण बॉसच्या बायकोच्या भावाची किवा त्याच्या सेक्रटरीचे वर्चस्व सहन करावे लागते किवा हितशत्रूच्या कारवायांमुळे  हैराण व्हावे लागते. हेच दोघे चंद्रासह असता मानसिक चंचलता, अस्वस्थता किवा मनाचा कोंडमारा होणे व एकांतवास असे अनुभव येतात. 
५) शनी-रवि किवा शनि-राहू शापित योग : हा योग पूर्वजांचा शाप दर्शवितो. या योगामुळे जातकाला कोणत्याच कामात यश मिळत नाही. प्रगती खुंटते. नोकरी लवकर मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही. धंदा असेल तर नुकसान होऊन धंदा बुडतो. संसारत अडचणी, वैवाहिक जीवनात असंतोष, संततीत किवा संततीपासून त्रास, अपेक्षित असलेला लाभ अनंत घोटाळे निर्माण होऊन तो मिळण्यास विलंब लागणे. हातातोंडाशी आलेला घास जाणे, मुला-मुलींचे ठरलेले विवाह मोडणे किवा अशा तऱ्हेच्या अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. एकूणच जीवनातील सर्वच आघाडयांवर अपयश येते, आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे माणूस हतबल होतो. 
६) चंद्र - शनि विकलांग योग - जन्मकुंडलीमध्ये चंद्रासह शनि असला म्हणजे हा योग होतो. यामुळे जातकास शारीरिक अथवा मानसिक विकलांगत्व येऊ शकते. म्हणजे शरीराचे एखादे अवयवास पंगुत्व येणे, मनोबल नसणे. त्यामुळे  समाजात वावरताना न्यूनगंड उत्पन्न होणे. असे अनुभव येऊन माणसाचे मानसिक / शारीरिक खच्चीकरण होते. 
७) सर्वारिष्ट शांती : शनि हर्षल व नेपच्यून ही  ग्रहत्रयी कुंडलीत कोठेही झाली तर माणसाला अपघाताचे भय जास्त असते. ही  शांती केल्याने अशा गोष्टींना आळा  बसतो व त्याचा फायदा त्या जातकासह त्याच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनाही होतो. 
८) पुत्रकामेष्टी / गोपाल संतान व्रत-जप : संततीप्राप्तीसाठी  हा विधी केला जातो. पती-पत्नी दोघेही जेव्हा शारीरिकदृष्ट्या निर्दोष असतात पण लग्नाला अनेक वर्षे  होऊनही संतती झाल्याची उदाहरणे आमच्याकडे शेकड्यांनी आहेत. दशरथ राजाला पुत्रकामेष्टी केली यज्ञ केल्यानंतरच राम-लक्ष्मनासारखे दिव्य पुत्र प्राप्त झाल्याची गोष्ट सर्वश्रुत आहेच! 
९) कुंभ / कृष्माड  विवाह :  जेव्हा पत्रिकेमध्ये वैधव्य योग होतो त्यावर हा उपाय केलास जातो. एखाद्या गुन्ह्याला एकदाच शिक्षा होते या तत्वावर ही संकल्पना बेतली आहे. या विधीमध्ये जातकाचा विवाह कुंभाशी (खापराचे मडके) लावला जातो. मग लग्नानंतर हा कुंभ फोडून त्याच्या अस्थि पाण्यात विसर्जित केल्या जातात. अशा रितीने लुटुपुटुच्या लढाईप्रमाणे जातकाला काल्पनिक वैधव्य दिले जाते आणि पुढील आयुष्यातील संकट टळते. 
१०) गुरुबळ : जेव्हा एखाद्याचा विवाह प्रमाणाबाहेर लांबतो किवा एखाद्याची नोकरी व्यवसायामध्ये सातत्याने पिछेहाट होते, अथवा सर्व प्रकारच्या कोर्टकेसेसमध्ये न्यायाची बाजू असूनही हार होते. तेव्हा ही  शांती केली जाते. 
११) सतीचा शाप-पितृदोष :  या दोषांमुळे मिळणारी फळे बहुतांशी शापित योगाप्रमाणे असतात. 
१२) गोमुख प्रसव शांती : देहशुद्धीसाठी गाईच्या तोंडून स्वतःचा पुनर्जन्म करून घेणे याला गोमुख प्रसव शांती असे म्हणतात नंतर ही  गाय ब्राह्मणाला दान दिली जाते. 
१३) उदक शांती :   उदक शांती चार कारणांसाठी केली जाते. त्याने चारही कारणाचे उद्देश ग्रहशुद्धीकरण हेच असते. पहिले कारण म्हणजे कालसर्प शांती केल्यानंतर उदक शांती करावी लागते. कारण त्याशिवाय कालसर्प शांतीचे फळ  मिळत नाही. दुसरे म्हणजे घरातील व्यक्ती निधन पावल्यानंतर तेरावा चौदावा विधी केल्यानंतर ग्रहशुद्धीसाठी उदकशांती करतात. तिसरे म्हणजे चारधामपैकी एखादी यात्रा करून आल्यानंतर घरी गंगापूजन असते असे तेव्हा उदकशांती करतात. चौथे म्हणजे वास्तुशांती तात्पुरता पर्याय म्हणून उदकशांती करतात. 
आमच्याकडे वरील सर्व शांती कर्माबरोबरच पारंपारिक ज्योतिषशास्त्रप्रमाणे नवग्रह शांती, नक्षत्र, दोष तसेच व्यतिपात, अतिगंड, गंड या योगांवर व विष्टी करणावर जन्म झाला असल्यास त्याचीही शांती करावी लागते. याशिवाय इतर दोष जसे सिनीवाली कुहु, कृष्णचतुर्दशी, दर्शतिथी, क्षयतिथी, त्रीक प्रसव, सदंत जन्म, एक नक्षत्र, विषकन्या, पुत्र यमल शांती, जनन शांती केली जाते. जन्मकुंडलीतील दोषाप्रमाणे दैविक उपाय केले जातात. याबाबत आण्णा विनामूल्य मार्गदर्शन करतात.    

-सुधीर गुरुजी 
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत

Thursday, 30 July 2015

मानवी जीवन समृध्द करण्यासाठी वास्तुशास्त्र आजच्या काळाची वाढती गरज

सदन, गृह हे शब्द माणसाच्या मनात फक्त प्रेम, आनंद, जिव्हाळा निर्माण करतात. या घरातच मानवी जीवनाचे पूर्ण विश्वच साकारले जाते, आकार घेते आणि त्याचे कुटुंबात रुपांतर होते. माणूस हा घरावेडा प्राणी आहे. हे घर माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक सुख-दु:खाचे हे घरच एकमेव साक्षीदार असते. 
आपल्या सर्वसामान्य माणसांचे जीवन अगदी चाकोरीबध्द असते. उदा. सांगायचे झालेच तर, असे म्हणता येईल की प्रथम शिक्षण मग नोकरी, मग विवाह आणि मग आपल्या गरजेनुसार शक्य झाल्यास एक - दोन खोल्यांचे आपण घर घेतो पण हे घर घेतानाही माणसाला अनेक खर्चांवर पाणी सोडून व्कचित आपल्या इच्छांना कुठेतरी मुरड घालून, काटकसर करून, आपल्या काही महत्त्वाकांक्षांचा बळी देऊन, वेळ प्रसंगी पोटाला चिमटा देत, बॅंकांकडून अथवा एखाद्या पतसंस्थेतून कर्ज घेऊन आपले घरकुलाचे स्वप्न पुरे करावे लागते. आपले घर घेऊन झाले अथवा बांधून झाले असे आपण समजू पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे घर घेताना आपण एवढ्या कष्टातून मार्ग काढला ते घर घेताना एखाद्या वास्तुतज्ञाचे मार्गदर्शन / सल्ला घेतला का? ज्या  घरात आपण राहणार आहोत त्या घरात मुले मोठी झाल्यावर आपल्याला सांभाळतील का? मुलांची लग्नं वेळेवर होतील का? या घरात पैशाची आवक चांगली राहील का? या घरातील नातेसंबंध चांगले टिकून राहतील का? या घरात आपला संसार फुलेले का? सुखाचा होईल का? जर आपण एखाद्या वास्तुतज्ञाचे मार्गदर्शन अथवा सल्ला घेतला असाल, त्याच्याकडून वास्तुची पडताळणी करून घेतली असेल तर या सर्वांची उत्तरे आपल्याला मिळाली असतीलच पण तसे आपणाकडून केले गेले नसेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच राहिली असावीत असे मला वाटते. 

सज्जनहो, आपण जर वास्तुशास्त्रानुरूप घरामध्ये वास्तव्य करीत नसाल तर आपल्या या लाडक्या घराला घरघर यायला वेळ लागणार नाही. आज आपण कितीही नाही - नाही म्हटले तरी आपले आरोग्य, यशापयश, किर्ती, पैसा, शैक्षणिक प्रगती, नातेसंबंध, कुटुंब प्रमुखाचे धैर्य, नेतृत्त्व, कर्तुत्त्व, प्रभुत्त्व, प्रशासन, प्रतिष्ठा पती -पत्नी सौख्य, कलह, अशांती, प्रगती, अधोगती या एक ना अनेक गोष्टींचा थेट संबंध वास्तूशी असतोच. हे शास्त्रानेही आता सिध्द करून दाखविले आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्त्व टिकविण्यासाठी मानवासहित सर्व प्राण्यांना निसर्गाशी मिळतेजुळते घेणे आवश्यक आहे आणि म्हणूनच एखाद्या वास्तूची निर्मिती करताना निसर्गाला अनुसरून केलेली रचना ही नेहमीच शुभ फलदायी ठरते. तर निसर्गाच्या विरुध्द जाऊन जर रचना केली तर त्याचे परिणाम हे माणसाला भोगावेच लागतात. 
    आज बहुतेक वास्तूंचे बांधकाम करताना चित्र-विचित्र पध्दतीने त्याला कट्स दिले जातात, जेणेकरून वास्तू अत्यंत सुशोभित व आकर्षक वाटेल. परंतु भारतीय वास्तुशास्त्रानुसार घराला जेवढे कट तेवढी घरात कटकट असा साधासोपा नियम आहे. परंतु आज वास्तु कशी सुशोभित करता येईल ? त्यासाठी जास्तीत जास्त जागेचा कसा उपयोग करून घेता येईल? मग ती जागा स्मशानाच्या शेजारची असो, तलावाच्या शेजारची असो अथवा मंदिराच्या समोरची असो जागेचा पुरेपुर उपयोग करून घेणे एवढेच उद्दीष्ट बांधकामतज्ञासमोर असते मग तेथे रहायला येणारा माणूस कळसाला पोहोचो अथवा रसातळाला या लोकांना त्याचे काही देणे - घेणे नाही. परंतु सज्जनहो, तुम्ही श्रम घेऊन जमविलेला आपला कष्टाचा पैसा कुठे गुंतवावा याचाही जरा विचार करावा. आपल्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीला काही अर्थ असूद्यात ! जेणेकरून तुमच्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीलाही काही अर्थ प्राप्त होईल. 
  वाचकहो, आज ऊठसूठ कोणीही वास्तुशास्त्रावर लिहू लागला आहे. आज बाजारात एक दोन पुस्तके सोडली तर तोतयेच जास्त पसरले आहेत. काही बाजारातली वास्तुशास्त्राची चार पुस्तके वाचून वास्तुतज्ञ बनले आहेत. आज लोकांचा या वास्तुशास्त्रावरील विश्वास ढासळतो आहे. याला कारण वास्तुनियमांच्या अर्धवट ज्ञानामुळे किंवा अर्धवट ज्ञानाने दिल्या गेलेल्या सल्ल्यांमुळे सामान्य माणूस अडचणीत सापडतो आहे. 
वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांवर आधारित एक महान शास्त्र आहे. ही एक तपश्चर्या, साधना आहे. या शास्त्राचा उपयोग रामायण - महाभारताच्या काळाच्या आधीपासून होत असल्याचे आढळून आले आहे. भारत ते श्रीलंका हा रामायण काळातला सेतू विश्वकर्मा यांच्या मुलाच्या म्हणजेच नल या वास्तुशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार बांधला गेला असल्याचे पुराण सांगते. व्दारका नगरी देवलोकांचा वास्तुतज्ञ 'विश्वकर्मा' याने वसविली होती. तर आयोध्द्या नगरीची रचना मनूने केली होती. महाभारतातल्या 'कांचनवन' व पांडवांच्या 'इंद्रप्रस्थ' नगरीचा निर्माणकर्ता म्हणून असुरांचा वास्तुतज्ञ 'मयासुर' याला ओळखले जाते. हे सांगायचे कारण एवढेच की या वास्तुशास्त्राला दहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. हे शास्त्र आजच जन्माला आलेले नाही. जे लोक या शास्त्राला थोतांड समजतात, अपुऱ्या ज्ञानातून लोकांची दिशाभूल करतात त्यांनी जाड भिंगाचे चष्मे लावून पुराणे जरूर वाचावीत. स्कंद पुराण, अग्नि पुराण, वायु पुराण, गरूड पुराण, नारद पुराण, मत्स्य पुराण, मानसार, शिल्परत्न, विश्वकर्म प्रकाश, बृहत्संहिता, वास्तुविद्या इ. अनेक ग्रंथांची यादीच देता येईल. 
 वाचकहो, वास्तुशास्त्र हे अथांग सागरासारखे आहे. माझ्या ओंजळीतून त्यातले चार थेंब तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न केला आहे. या शास्त्रावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका हा तुमचा ऐच्छीक विषय आहे. त्यावर माझी कोणत्याही दोषी वास्तूमध्ये राहून तुमचे नुकसान होऊ नये, सर्वांचे कल्याण व्हावे एवढीच तळमळ उराशी बाळगून सदैव कार्यरत असतो. एखाद्या चुकीच्या जागेवर विव्दान बसलेला असल्यास त्याच्या वाट्याला दु:ख, दारिद्रय, मानहानी, अपमान या गोष्टी येतात. याउलट योग्य जागी बसलेला एखादा बुध्दीहीन हा सर्व बुध्दीमान लोकांच्या सभेत प्रमुख पाहुणा म्हणून मिरविण्याचा मान त्याला मिळतो. फरक असतो तो फक्त जागेचाच. 
 वाचकहो, या वास्तुशास्त्राच्या सहाय्याने आपण आपले सुख - समाधान - शांती वृध्दींगत करू शकतो. आपली राहती वास्तू जर शास्त्राला अनुसरून असेल तर पूर्व कर्मानुसार भोगावयांची जी फळे आहेत त्यांची तिव्रता यातून कमी होईल. प्रत्येकाच्या कर्मानुसार लिहिलेले विधिलिखीत आपण टाळू शकत नाही. पण सुखामागून येणारे जे दु:ख आहे ते चार दिवस थांबवून सुखाचे चार दिवस या शास्त्राच्याअवलंबनाने नक्कीच वाढवू शकतो एवढेच मी म्हणेन 
धन्यवाद !                               
             
- सौ.गायत्री पाटोळे 
वास्तुविशारद तज्ञ 
मो. ९२२१२५०४०४ -
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत

Wednesday, 17 June 2015

आमच्याकडे पूजा करण्यामध्ये, इतरांपेक्षा वेगळे काय?

शांतीपूजा म्हणजे नेमके काय?
आमच्याकडे पूजा करण्यामध्ये, इतरांपेक्षा वेगळे काय?
  सतत बारा वर्षे असंख्य कुंडल्यांचा अभ्यास करून, गायत्री उपासक अण्णांनी सर्वसाधारण दोषांचे संकलन केले आहे. हे एकूण २७ दोष आहेत. त्यांची यादी आमचे लेटरहेडवर छापली आहे. त्या पत्रिकांचा अभ्यास करताना अण्णांना असे आढळून आले की, शेकडा ९०% माणसांचे पत्रकेमध्ये कालसर्प दोष आणि पितृदोष येतो. म्हणून आम्ही आमच्या शांतीपूजा पॅकेजमध्ये नेहमीचे गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदी श्राध्दाबरोबर कालसर्प शांती पूजेस अग्रक्रम दिला आहे. त्यानंतर किंवा कुठल्याही पूजे अगोदर 'गोमुख प्रसव शांती' करणेचे विधान आहे. म्हणून प्रत्येकाची गोमुख प्रसव शांती सुरुवातीस केली जाते. 
कालसर्प शांती नंतर यजमानाचे पत्रिकेतील इतर जनन दोष जसे नक्षत्र, तिथी, योग करणे मंगळ दोष यांची शांती पंचोपचार पूजनाने केली जाते. त्यानंतर इतर दोषांसाठी आणि कालसर्प शांतीमधील प्रमुख देवता सर्प तसेच नवनाग यांची आद्यदेवता भवानी शंकर अर्थात महारूद्द देवतेस दूधाचा रुद्राभिषेक केला जातो. नंतर नवग्रह शांती केली जाते. कारण प्रत्येकाचे पत्रिकेत (मूळ किंवा गोचर) कोणीना कोणी ग्रह प्रतिकूल असतोच. म्हणून 'नवग्रहशांती' आम्ही करतो. 

उदक शांतीचे महात्म्य 
   सर्वात महत्त्वाचा फरक आमचे येथे जो दिसतो तो आहे. उदक शांती, कालसर्प शांती करणे गरजेचेअसते. नाहीतर कालसर्प शांतीचे शुभफळ मिळत नाही. ज्यावेळेस एखादा माणूस आमच्याकडे येतो आणि असे सांगतो की आम्ही नाशिकला जाऊन शांती केली पण काहीच फायदा झाला नाही. त्यावेळेला आमच्या असे निदर्शनास आले की, त्या व्यक्तीने घरी येऊन उदक शांती  केलेली नसते. हे लक्षात घेऊन, आम्ही आमच्या पॅकेजमध्ये उदकशांतीचा प्रयोग अंतर्भूत केला आहे. त्यामुळे एक तर त्याचा खर्च व वेळ तर वाचतोच पण पूजेचे फळही तात्काळ मिळते. 

अनिष्ट ग्रहांचे जप 
आमच्याकडे शांतीपूजा करणेचा अजून एक फायदा असा असतो की, आम्ही पूजा केल्यानंतर अनिष्ठ ग्रहांचे जपही दुसऱ्या ब्राह्मणांकडून करवून घेतो. कालसर्प शांतीचे फळ न मिळालेल्या लोकांनी ग्रहांचे जप केलेले नसतात. जप केला म्हणजे ग्रह संतुष्ट होतात आणि आपली कृपा ठेवतात. म्हणून आम्ही प्रत्येक यजमानाने पत्रिकेतील अनिष्ट ग्रहांचे जप करतो. हे जप ३ ते ६ महिने या कालावधीत पुरे होतात. 
कालसर्प शांती ही इतर जननशांती कर्मासारखीच सर्व सामान्य शांती आहे. त्यामुळे ही शांतीसुध्दा इतर शांतीप्रमाणे स्वत:चे घरी किंवा शंकराचे देवळात किंवा जलाशयाजवळ / गोशाळेत जाणेचे गरज नाही. असे धर्मसिंधू आणि शांतीकर्म या पुस्तकात नमूद केले आहे. नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राध्द मात्र फक्त नाशिक येथेच होते. ते इतर कुठेही करता येत नाहीत. त्यासाठी त्र्यंबकेश्र्वर येथेच जावे लागते. 

अण्णांचे वेगळेपण काय आहे
मोफत सल्ला, शांती कुठूनही करणेची मुभा, शांती केल्यानंतर तोंड न लपवता, यजमानास सतत संपर्कात राहणेस सांगणे, पूजा केल्यानंतर यजमानास मिळणारे त्वरीत फळ. या सर्वांपेक्षा आणखी एक गोष्ट गायत्री उपासक अण्णांकडे अधिक आहे ती म्हणजे कुठल्याही रोगावर किंवा बाधेवर होणारे उपचार. हे उपचार देखील अण्णा विनामूल्य करतात. ज्या व्यक्ती अत्यवस्थ घरी किंवा हॉस्पिटलमध्ये असतात, जेणेकरून अण्णांकडे येऊ शकत नाहीत अशांचे उपचारासाठी अण्णा स्वत: त्याठिकाणी जातात. त्याबदल्यात कशाचीही अपेक्षा ते ठेवीत नाहीत. फक्त त्यांचे वेळेनुसार ते जातात. हे कर्म ते अत्यंत निरपेक्ष भावनेने करतात. त्यामुळे कित्येक जणांचे मनामध्ये, गायत्री उपासक अण्णांचे, स्थान देवापेक्षाही वरचे आहे, हेही तितकेच खरे… 
                                                                                    शब्दांकान- सुधीर गुरुजी     
                                                  

कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत

प्रगती ज्योतिष विषयी


 'समस्या नाही असा मनुष्य नाही, उपाय नाही अशी समस्या नाही' देवाने जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण केली. त्याचवेळीस सर्वांचे पालनपोषणाची जबाबदारीही त्याने घेतली आहे. त्याने जीवाला जगावयास लागणाऱ्या साधनांची अगोदर निर्मिती केली आणि मगच जीव जन्माला घातले. प्रथम स्त्रीचे स्तनांमध्ये दूध निर्माण होते आणि मगच बाळाचा जन्म होतो. याचधर्तीवर, जीवावर येणारी संकटे किंवा त्याला भेडसावणाऱ्या समस्यांवरील उपाय देवाने आधीच योजले आहेत. दुसऱ्या भाषेत असेही म्हणता येईल की, ज्यावेळेस कुलूप तयार होते. त्याचवेळेस ते कुलूप उघडणाऱ्या चाव्याही तयार होतात. ज्याप्रमाणे प्रत्येक कुलूपास चावी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. कुठेतरी वाचलेले हे वाक्य. गायत्री उपासक अण्णांनी आपले घोष वाक्य बनवले आहे. फक्त प्रश्न एवढाच असतो की, योग्य माणूस भेटून त्याने योग्य सल्ला देणे. गायत्री उपासक अण्णा हे कार्य गेली अनेक वर्षे करीत आहेत. तेही विनामूल्य. कशाचीही अपेक्षा न ठेवता. निरपेक्ष बुध्दीने अण्णांनी हे व्रत चालवले आहे.

आमची कार्यप्रणाली 
    प्रगती ज्योतिषमध्ये गायत्री उपासक अण्णा विनामूल्य म्हणजेच मोफत ज्योतिषविषयक सल्ला देतात. हा सल्ला फोनवरून दिला जात नाही. त्याचप्रमाणे जन्मकुंडली घेऊन प्रत्यक्ष भेट घ्यावी लागते. घरातील प्रत्येक व्यक्तीने भेट घेणे आवश्यक नाही. कुणीही एक व्यक्ती घरातील सर्वांच्या पत्रिका दाखवून प्रत्येकासाठी स्वतंत्र सल्ला घेऊ शकते. 

जन्मपत्रिका घेऊन अण्णांकडे ऑफिसमध्ये माणूस आला की, प्रथम त्याचे पत्रिकेतील आम्हाला आवश्यक असलेला मजकूर-तपशील आम्ही आमच्या लेटरहेडवर उतरवून घेतो. तुमच्याकडे जर जन्मपत्रिका नसेल तर तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण विचारून ५ मिनिटात पत्रिका तयार करून देतो. यासाठी मात्र नाममात्र ५०/- आकार घेतला जातो. पेपर (लेटरहेड) तयार झाले म्हणजे रांगेत बसून घ्यायचे आणि आपला नंबर आला की अण्णांपुढे जाऊन बसायचे. त्यांना आपल्या समस्या सांगायच्या. पत्रिका बघून अण्णा त्याच पेपरवर, त्यातील दोष लिहून देतात. त्याला आमच्याकडे लागणारा खर्चही लिहून दिला जातो. सदर दोष काढणेची शांतीपूजा तुम्ही कुठूनही कोणाकडूनही करून घेऊ शकता. आमच्याकडेच पूजा करा असा आग्रह नसतो. लोकांची सोय व्हावी. त्यांना गुरुजी बघणे, साहित्य गोळा करणे वगैरेसाठी लागणारा वेळ वाचावा, यादृष्टीने पूजेची सोय आम्ही आमच्याकडे ठेवली आहे इतकेच. तथापि बहुतेक लोक अण्णांच्याकडेच पूजा करणे पसंत करतात, ही गोष्ट वेगळी. 

***
कल्याण - ( गायत्री उपासक अण्णा प्रत्येक महिन्याच्या १६ ते ३० तारखेपर्यंंत पुण्यामध्ये भेटतील.) 
तिर्थधाम कॉम्प्लेक्स, द्वारका बिल्डिंग, प्लॅट नं.२ , तळमजला, साईबाबा मंदिरासमोर, लाल चौकीजवळ, आधारवाडी रोड, कल्याण(प) पिन.४२१३०६ 
फोन - 
०२५१-२३११८२१/ ९८५००३०१२०/९२२०९१८७२०/९८५०२९५७९८/९४२१९८३८७५
भेटण्याची वेळ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्य़ंत